कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद: आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत ऑनलाइन सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणाचे वाटप करण्यात आले.
कारीत शेतकऱ्यांना सोयाबिन बियाणाचे वाटप
शेतकर्यांनी पेरणी योग्य म्हणजेच 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर, वापसा आल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करूनच बी. बी. एफ यंत्राद्वारे पेरणी करावी असे आवाहन कृषी सहाय्यक मजित शेख यांनी केले. यावेळी तलाठी पवार, अतुल चालखोर, अनिल कदम, अमोल जाधव, दत्तात्रय जाधव, परमेश्वर बोडके, विलास सारंग, जगदीश डोके, नितीन कात्रे यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते.