कुतूहल न्यूज नेटवर्क- विजयकुमार मोटे
जि.प.प्रा.शाळा, केसकरवाडीस क्रीडांगण विकास योजनेअंतर्गत क्रीडा साहित्यचे वाटप
पंढरपूर : शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये, बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकासालाही प्रधान्य दिले गेले आहे. परंतु प्रत्येक शाळेत सर्व भौतिक सुविधा उपलब्ध असतातच असे नाही. विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्यासाठी शालेय स्तरावर विविध शै. क्रीडा उपक्रम राबवले जातात. शाळांना शैक्षणिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवता यावेत यासाठी शासनाच्या विविध योजना अंतर्गत भौतिक सुविधा पुरवल्या जातात.
याचाच एक भाग म्हणून, पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथील जि.प.प्रा.शाळेस जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यातर्फे क्रीडांगण विकास योजनेअंतर्गत (सन २०१९-२०) दि.२१ ऑगस्ट रोजी शैक्षणिक क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा क्रीडाधिकारी यांनी प्रथमच शाळेस दिलेल्या क्रीडा साहित्यांद्वारे मुलांची उपस्थिती तर वाढणार आहे; त्या बरोबरच विद्यार्थ्यांमध्ये खेळाचीही आवड निर्माण होणार आहे. तसेच यातूनच पुढे एखादा चांगला खेळाडू होऊ शकतो. असे मत प्राचार्य हनमंतराव जमदाडे यांनी व्यक्त केले.
यावेळी, जि. प. प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका अलकाताई गुजरे-जमदाडे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर चे सिनिअर क्लार्क माने, पंढरपूर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष नागनाथ क्षीरसागर, क्रीडाशिक्षक प्रा. संतोष पाटील व इतर सहकारी शिक्षकवर्ग उपस्थित होते.