कुतूहल न्यूज नेटवर्क
मुंबई: गेल्यावर्षी कोकणातील पोलादपुर येथे आलेल्या महापुरात तेथील लोकांचे जनजीवन विस्कलित झाले होते. अशा परिस्थितीत मुंबई येथील पेपरची लाइन टाकणाऱ्या युवकांनी लोक सहभागातून आदिवासी आणि दुर्गम भागात जाऊंन पुरग्रस्ताना जीवनावश्यक वस्तुंची मदत केली होती. त्यांच्या या उत्कृष्ठ समाजसेवेची सोलापुर जिल्ह्यातील काटेगाव येथील स्टार सोशल फाउंडेशनने दखल घेऊन संस्थेमार्फत या युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना स्टार फाउंडेशन तर्फे प्रशंसा प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन संस्थेच्या पदाधिकारी यांनी सन्मान केला.
स्टार सोशल आवार्डचे मुंबई येथे वितरण
यावेळी नरेश सुर्वे, सचिन यादव, स्वप्निल बिरवाडकर यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना स्टार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमीन गोरे यांनी सांगितले की अशा युवकांचा जे पेपर ची लाइन टाकतात त्यांनी एकत्र येऊन पुरग्रस्थाना एवढी मोठी मदत पोहचवली, अशा तरुणांची समाजाला अत्यंत गरज आहे की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातील माणुसकी जीवंत ठेवण्याचे काम या युवकांनी केले. अशा युवकांचा सन्मान करने है आमचे भाग्यच आहे.
यावेळी सचिन यादव यांचा सन्मान अध्यक्ष अमीन गोरे व उपाध्यक्ष अनिल पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. स्वप्निल बिरवाडकर यांचा सन्मान संस्थेचे सचिव साबिर अली शेख पदाधिकारी आतिफ पटेल, विवेक चौरे यांच्या हस्ते पार पडला. तसेच यामधील सत्कारमूर्ति नरेश सुर्वे हे काही कारणाने उपस्थित राहु शकले नाही त्यांच्या तर्फे अमित यांनी सन्मान स्वीकारला. हा पुर्ण समारंभ अनाथ मुलांना अमित याच्या हस्ते स्वेटर आणि जेवण देऊन लिटिल एंजेल आश्रम येथे पार पडला.