कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी : इरशाद शेख
शशिकांत बगाडे क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ पांगरी संचलित राजीव गांधी केंद्रीय आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता १० वी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी प्रणव दळवी याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पांगरी- राजीव गांधी आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध पुरस्कारांचे वितरण
स्वातंत्र्य दिनाचे औचित्यसाधून विविध पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, गुणवंत शिक्षक व गुणवंत कर्मचारी पुरस्कार, कोरोना काळामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कोविड योध्दा आदी पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
या पुरस्काराचे वितरण प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, संस्था अध्यक्ष प्रा. संजीव बगाडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य शिवपुत्र धत्तरगांव, ॲड. अनिल पाटील, प्रा. विलास जगदाळे, वीज वितरणचे उप अभियंता भारती, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोलीस उप निरीक्षक प्रवीण सिरसाट, सरपंच सुरेखा लाडे, संस्थेच्या उपाध्यक्ष सुलभा जगताप, मुख्याध्यापिका किरण बगाडे आदी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रणव दळवी, रशिका पवार, महादेव चव्हाण, साळू खुडे, अभिषेक हागवणे व विनोद लोंढे या विद्यार्थ्यांना देण्यात आला. गुणवंत शिक्षक पुरस्कार बालाजी घावटे तर गुणवंत कर्मचारी पुरस्कार हा वसतिगृह अधीक्षक वाहिद शेख यांना देण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत संस्थेच्या वतीने कोरोना काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या कोविड योद्ध्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. डॉ. आश्विनी ताकभाते (आरोग्य विभागा), उषा पतूले (आशा वर्कर), संगीता नाईकवाडी (अंगणवाडी सेविका), विकास माने (पोलीस कर्मचारी), गौतम जानराव (सफाई कर्मचारी), मयूर जमदाडे (वीज वितरण), गणेश गोडसे (पत्रकारीता) व बाबासाहेब शिंदे (पत्रकारीता) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच जागरूक पालक पुरस्कार प्रमोद चौधरी यांना देण्यात आला. पांगरीच्या कोविड सेंटरमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल सरपंच सुरेखा लाडे यांचे पती डॉ. विलास लाडे यांना विशेष पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमास पत्रकार इरशाद शेख, सचिन ठोंबरे, अनिल जगताप, माजी उपसभापती विजय गरड, माजी सरपंच सुभाष चांदणे, मेजर बाळासाहेब मोरे, माजी उपसरपंच सतीश जाधव, हनुमंत बगाडे, शाळेचे कर्मचारी उपस्थित होते. संस्था अध्यक्ष प्रा.संजीव बगाडे यांनी संस्थेचा आढावा सांगितला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी बगाडे यांनी तर सूत्रसंचालन रजनी पाटील यांनी केले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount