कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद: आसिफ मुलाणी
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी बुधवारी ( दि. 23) तालुक्यातील कारी गावाला भेट दिली. यावेळी तेथील नागरिकांशी संवाद साधला. शिक्षण, आरोग्य, महसूल, महिला बालकल्याण, लघुपाटबंधारे या विषयावर चर्चा करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. गावातील नागरिकांसाठी गावांमध्येच लसीकरणाचे आयोजन करावे अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी यांना वृक्षाचे रोपटे देऊन सरपंच निलम कदम व उपसरपंच खासेराव विधाते यांनी सन्मान केला. यावेळी गावातील विविध समस्या, प्रश्न बाबतचे निवेदन अमोल जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना यावेळी दिले.
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांची कारी गावाला भेट
आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, पाटबंधारे विभाग याची विभागणी होण्याचे बाकी आहे याची विभागणी झाल्याशिवाय या ठिकाणी विकास कामे सुरू होणार नाहीत हे सर्व धोरणात्मक विषय मी समजून घेतले आहेत. यातील काही विषय महसूलचे आहेत त्यामध्ये तलाठी सज्जा निर्मितीचा प्रस्ताव आहे तो विभागीय आयुक्तांना मी पाठवतो आहे. या गावांमध्ये तलाठी सज्जा झाला पाहिजे असा प्रस्ताव दिला आहे मी माझ्या स्तरावरून जी काही माहिती द्यावी लागते ती देतोय. कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी उस्मानाबाद.
यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार गणेश माळी, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश तायडे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी, विस्तारधिकारी संजय कळसाईत, आरोग्य विस्तार अधिकारी रमाकांत हजारे, सी .एच .ओ. पूजा हिंगे, सांख्यिकी विस्तार अधिकारी उदयसिंह चौरे, मंडळ अधिकारी अनिल तीर्थकर, ग्रामविकास अधिकारी अनंत सोनटक्के, तलाठी अमर पडवळ, सरपंच नीलम कदम ,उपसरपंच खासेराव विधाते, पोलिस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी अनंत सोनटक्के यांनी केले.