कुतूहल न्यूज नेटवर्क : दयानंद गौडगांव
शिवसेनेने बनवलं दिव्यांग बालकलाकार रेवणसिध्द फुलारी ला जिल्हाचे सर्वोत्कृष्ट संगीत स्टार
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील तोळणुर येथील दीव्यांग बालकलाकार रेवणसिद्ध पुंडलिक फुलारी यांनी “गानसंध्या” हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे व अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या वतीने सोलापूर ग्रामीण घडामोडी या फेसबुक ग्रुपवर आयोजित करण्यात आला होता. सोशल ग्रुपवर अंध कलाकाराचे गायन लाईव्ह प्रसिद्ध करून त्या दीव्यांग बालकलाकाराचे बंद खोलिआड असलेली कला गायन जगासमोर दाखवून स्टार बनविण्यात शिवसेना यशस्वी झाला आहे. अशी प्रतिक्रिया आनंद बुक्कानुरे यांनी प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.
रेवणसिद यांनी तबलावादन करत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वर अतिशय सुंदर गाण्याचं गायन केलं. बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यावर स्वत: रचना करून घातल्यामुळे सोशल मिडियावर त्या गायनाला एका रात्रीत तब्बल अडीच लाख व्हिव्ज मिळाले. त्यामुळे एका रात्रीत त्याला जिल्ह्यातील स्टार बनविण्याचा मानस शिवसेना अक्कलकोट तालुका सत्यात उतरवला आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका उपप्रमुख प्रमुख आनंद बुक्कानुरे, सुर्यंकात कडबगावकर, योगेश पवार, प्रविण गाडगे, महिला आघाडी प्रमुख चव्हाण, हावनुर, कुभार ,शिवसेना पदाधिकारी व शरणपा फुलारी सर व सोलापूर ग्रामीण घडामोडी ग्रुपचे माॅडिरेटर दयानंद गौडगांव, बसवराज बुक्कानुरे आदींनी परिश्रम