कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: सौंदरे येथे नुकतेच पार पडलेल्या सोसायटी निवडणुकीत आमदार राजाभाऊ राऊत यांच्या गटाने विरोधकांचा १३ विरूद्ध ० फरकाने पराभव करून दणदणीत विजय मिळविला. मतदान प्रक्रियेतून झालेल्या १२ जागांवर विजय मिळवित व मतदान पूर्वी १ जागेवर बिनविरोध विजय मिळवित एकूण १३ जागांवर प्रस्थापितांच्या विरोधात निर्विवाद वर्चस्व मिळविले.
सौंदरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर आमदार राजाभाऊ राऊत यांचे वर्चस्व
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व सौंदरे गांवचे उपसरपंच राजाभाऊ सुरवसे, चंद्रकांत कानगुडे, भालूआबा वाणी, भारत कदम व आमदार राजाभाऊ राऊत समर्थक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली सदरची निवडणूक लढली गेली. या निवडणुकीत श्रीधर कानगुडे, सुरेश जाधव, भगवान चव्हाण, मारूती कदम, हनुमंत जाधव, सुनील कानगुडे, विजय कदम, उत्तम लोंढे, चंद्रकांत पवार, श्रीमंत जगताप, परमेश्वर कानगुडे, चित्रा कानगुडे, अनुराधा कदम हे तेरा उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले.
या विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचा, आमदार राजाभाऊ राऊत यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी नगरसेवक प्रकाश मनगिरे, विलास आप्पा रेनके, प्रशांत कथले, बाबासाहेब मोरे, भारत पवार उपस्थित होते.