fbpx

प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात उपचारासाठी आलेल्या गोरगरीब जनतेला वेठीस धरू नका ; शिवसेना तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे

दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क

अक्कलकोट : तालुक्यातील गोरगरीब जनता कोरोना सारख्या गंभीर माहामारी संकटाला तोंड देत असताना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना रुग्णालयात गोळ्या, औषधे उपलब्ध नसल्याचे कारणे सांगून व आरोग्य केंद्रात डॉक्टर आरोग्य सेवक व आशावर्कर्स प्रत्यक्ष कामावर हजर न राहता गोरगरीब रुग्णांना उपचारापासुन वंचित ठेवण्याचा व प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदरपणात स्त्रियांना व किरकोळ दुखापत किरकोळ आजारावरिल रुग्णांना रुग्णसेवा नाकारण्याचा प्रकार सर्रास पणे चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. अक्कलकोट तालुक्यात कल्लहिपरगे उपकेंद्रासहित नागणसुर करजगी तडवळ भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रा संबधी तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. यासंबंधी डॉक्टर,आरोग्य सेवक व आशावर्कर यांना मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एच. ओ. या विषयी योग्य चैकशी करून संबंधीतावर योग्य कारवाई करून गोरगरीब जनतेला शासकीय आरोग्य सेवेचा सुरळीत लाभ मिळवून द्यावे, अशी मागणी तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी केली आहे. या स़ंबधी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व तालुका प्रमुख स़ंजय देशमुख यांच्या नेतृत्वखाली मा. जिल्हाअधिकारी सोलापुर यांच्या कडे तक्रार करणार आहोत. तालुक्यातील अशी बेजबाबदारपणेची कामे शिवसेना खपवून घेणार नाही असेही यावेळी ते म्हणाले.

यावेळी तालुका उपप्रमुख प्रा. सुर्यंकात कडबगावकर, सैपन पटेल, प्रविण घाटगे, शहर प्रमुख योगेश पवार ,सोपन निकते, विभाग प्रमुख पंडित मोरे , उपविभाग प्रमुख चौडप्पा गुजा, कृष्णा रजपूत, उमेश सांळुखे, खंडु कलाल, प्रसिद्धी प्रमुख बसवराज बिराजदार, तालुका महिला आघाडी प्रमुख वर्षा चव्हाण ,शहरप्रमुख वैशाली हावनुर, उपप्रमुख ताराबाई कुभांर, विनोद मदने व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *