कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी (आसिफ मुलाणी): उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील ज्ञानोपासना सार्वजनिक वाचनालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ज्ञानोपासना सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रंथपाल अविनाश कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महावीर बोडके, आसिफ मुलाणी, लक्ष्मण गादेकर, रोहित हाजगुडे, विजय गादेकर, तुषार माने आदी उपस्थित होते.