कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद शाळेत भारतातील पहिली महार-मांग वतनदार परिषदेच्या निमित्ताने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दिनांक २२ व २३ डिसेंबर १९४१ रोजी मुक्कामी थांबले होते. या जागेची पाहणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पाहणी केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पावन भूमी असलेल्या कसबे तडवळे येथील प्रस्ताव तत्काळ निकाली काढून याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही- राज्यमंत्री संजय बनसोडे

यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, जिवनराव गोरे, माजी आ.राहुल मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, डॉ. प्रतापसिंह पाटील, सुरेशजी पाटील, शामजी घोगरे, किरण आवटे, युवकचे तालुका अध्यक्ष अमरसिंह देशमुख, आळणीचे सरपंच प्रमोदजी वीर, दौलतजी गाढवे, तुकारामजी शिंदे, सुदर्शनजी करंजकर, एस के इनामदार, तेजस भालेराव आदी उपस्थित होते.