कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर .रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात ग्रंथपाल प्रा. ए. ए. जेवळीकर म्हणाले की डॉ एस. आर. रंगनाथन जयंती व देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने कला, साहित्य, संस्कृती संवर्धन विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्त तेथेच कला प्रकारच्या स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. या ऑनलाईन स्पर्धा घेऊन त्यातून निवडक विद्यार्थी यांना ऑगस्ट महिन्यात शेवटी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
झाडबुके महाविद्यालयात डॉ. एस.आर. रंगनाथन यांची जयंती साजरी
मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ. एन. आर. दणाणे यांनी ग्रंथालयाचे महत्त्व सांगून प्रत्येक घरात ग्रंथालय असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात ग्रंथालयाची भूमिका यावर आपले विचार मांडले. ग्रंथालय विभागाच्या वतीने घेण्यात आलेली डॉक्टर केसा रंगनाथन यांची जयंती व देशाच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवानिमित्त स्पर्धा घेण्यात आलेले आहेत याबाबत ग्रंथालय विभागाचे कौतुक या स्पर्धेमुळे नक्कीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे उपप्राचार्य प्रा ए. डी. सुर्वे म्हणाले.
यावेळी प्राचार्य डॉ मनोज गादेकर, प्रा एस. आर. खराडे, प्रा व्ही. मुलाणी, प्रा बी. ए. करडे, प्रा एस. बी. रनदिवे, प्रा आर. व्ही. जाधव, प्रा वाय. आर. घेवारे, प्रा एस. एम. उबाळे, प्रा पी. जी. माने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश दराडे तर आभार विक्रम सुरवसे यांनी मानले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount