चंदीगड– सिंघम नावाने ओळखल्या जाणाऱ्या डीएसपी अतुल सोनी याने आपली पत्नी सुनीता सोनी यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला जात आहे. डीएसपी अतुल सोनी (DSP Atul Soni) वर पंजाब पोलिसांत खुनाचा प्रयत्न (Attempt to murder) आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये (Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंघम नावाने ओळखल्या जाणाऱ्या डीएसपी ने पत्नीवर झाडल्या गोल्या
सविस्तर घटना अशी की,
ही घटना शनिवारी रात्रीची आहे. अतुल सोनी दुपारी अडीचच्या सुमारास पार्टीमधून घरी आला. झोप लागली असल्यामुळे पत्नीला घराचा दरवाजा उघडण्यास उशीर झाला. डीएसपी सोनी याला याचा एवढा राग आला की त्याने पत्नीवर गोळी झाडली. सुदेवाने ती जिवंत वाचली आहे. डीएसपीच्या पत्नीने मोहालीच्या स्टेशनच्या फेज आठ मध्ये तिच्या पतीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अतुल सोनीने त्याच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरवरून नव्हे तर बेकायदेशीर रिव्हॉल्व्हरवरून गोळी झाडल्याचा आरोप आहे . घटनेत वापरलेली शस्त्रे आणि काडतुसे पंजाब पोलिसांच्या ताब्यात सुनीता सोनी यांनी दिल्या आहेत.