कुतूहल न्यूज नेटवर्क
E Pass- असा काढा ई-पास; राज्यात अत्यावश्यक प्रवासासाठी पुन्हा एकदा ‘ई-पास’ लागू
राज्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत अनेक कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यातच राज्यात प्रवास करण्यासाठी आता ‘ई-पास’ लागू करण्यात आला आहे. रितसर अर्ज करून पास मंजूर झाल्यानंतरच नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करता येणार आहे.
22 एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून राज्यातील प्रवास, कार्यालयीन उपस्थिती आणि विवाह सोहळ्याशी संबंधित काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. हे निर्बंध एक मेपर्यंत लागू राहणार आहेत. दरम्यानच्या काळात महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास नागरिकांना ई-पासचा वापर करावा लागणार आहे.
अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाह सोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणीबाणी या कारणांसाठीच ई-पास मिळवता येऊ शकतो. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही.
कोणतीही व्यक्ती अथवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करू शकतो. ज्या नागरिकांना ऑनलाइन सेवेसाठीचा ॲक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी या प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलिस स्टेशनला भेट द्यावी. तिथे नागरिकांची मदत केली जाईल.
For interstate and inter-district emergency travel, you can apply for an E-Pass at https://t.co/jR6ROcBcPU
You can also walk in to your nearest Police Station for assistance.
We urge all citizens to apply for an E-Pass only in the case of extreme emergencies.#EPassForTravel
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) April 23, 2021
‘असा’ काढा ई-पास
- सर्वप्रथम https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळाला भेट द्या
- त्यानंतर ‘apply for pass here’s या पर्यायावर क्लिक करा
- ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे तो जिल्हा निवडा
- आवश्यक कागदपत्रे जोडा
- प्रवास करण्यासाठीचे अत्यावश्यक कारण नमूद करा
- कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करा
- अर्ज केल्यानंतर एक टोकन आयडी मिळेल. तो जपून ठेवा. या टोकन आयडीद्वारे ई-पासचे स्टेटस तसेच अर्ज मंजूर झाल्यानंतर ई-पास डाऊनलोड करता येईल
- या पास मध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासची वैधता आणि क्यू आर कोड असेल
- प्रवास करताना पासची मूळ प्रत आणि त्याची सॉफ्टकॉपी सोबत बाळगा. प्रवासादरम्यान पोलीसांनी विचारणा केल्यानंतर त्यांना हा पास दाखवता येऊ शकेल.