कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
प्रगती फाउंडेशन ने उस्मानाबाद तालुक्यातील कारी हे गाव दत्तक घेतले आहे. शुक्रवारी (दि. ९) गावामध्ये सदृढ बालक अभियानांतर्गत १ ते १४ वयोगटातील मुलां-मुलींना पोषक आहार म्हणून अंडी वाटप करण्यात आले. कारी गावच्या विकासात प्रगती फाउंडेशन सक्रिय काम करेल, असे प्रतिपादन प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष जी. एम. दिवटे यांनी केले.
कारीत सदृढ बालक अभियानांतर्गत अंडी वाटप, प्रगती फाउंडेशनचा उपक्रम
यावेळी उपसरपंच खासेराव विधाते, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष जी. एम. दिवटे, ग्रा.पं. सदस्य अतुल चालखोर, अमोल जाधव, परिक्षितराजे विधाते, कामराज बनसोडे, अनिल कदम, सतीश सारंग, रवींद्र आटपळकर, राजेंद्र डोके, बापू गोफणे, अमोल काळे, आसिफ मुलाणी, ग्रामपंचायत कर्मचारी नितीन कात्रे, कुमार तेलंगे, विनोद सोनवणे, सुधीर काळे, व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.