कुतूहल न्यूज नेटवर्क
गौडगाव आरोग्य केंद्रातील पत्ते खेळणारे कर्मचारी निलंबित
बार्शी : गौडगाव तालुका बार्शी येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी पत्ते खेळत असल्याचा फोटो व्हायरल झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोग्य केंद्रातील या दोन सरकारी कर्मचाऱ्यांना पत्ते खेळणे भोवले आहे. त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी सेवेतून निलंबित केले आहे.
एस.एच. धोत्रे आणि पी. जे. दराडे असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. धोत्रे हे कनिष्ठ सहाय्यक पदावर तर दराडे हे परिचर म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव येथे कार्यरत आहेत. ते दोघेही एका अज्ञात ठिकाणी पत्ते खेळत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. ओपीडीच्या वेळेत गैरहजर राहणे, पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडणे अशा विविध कारणे दाखवत यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्या दोघांनाही निलंबित करण्यात आलेले आहे. सीईओ वायचळ यांनी सोमवारी दुपारी ही कारवाई केली.
हे प्रकरण खूपच गाजले होते. बार्शी तालुक्यातील गौडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी पत्ते खेळत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा तणावात असताना हे कर्मचारी मात्र मजेत असल्याचे चित्र पाहून नागरिकांतून संताप व्यक्त झाला होता. भालगाव येथील तरुणांच्या ग्रुप वर गौडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी पत्ते खेळत असल्याचे फोटो व्हायरल झाला होता.