fbpx

रुक्मिणी सप्ताहानिमित्त उद्योजक महिलांची कार्यशाळा

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: रुक्मिणी सप्ताहानिमित्त उद्योजक महिलांची कार्यशाळा बार्शी तालुक्यातील जामगाव (पा) येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेच पूजन करण्यात आले. दरम्यान, प्रास्ताविक करताना प्रभाग समनव्यक संतोष पालके यांनी उपळे (दु) प्रभागातील कामाचा आढावा सादर केला. यशस्वी उद्योजक महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रमोद वाघमोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांना व्यवसायाच्या संधी कोठे उपलब्ध आहेत याचे मार्गदर्शन करत हंगामी पद्धतीने व्यवसाय करण्याची सूचना केली. व्यवसायिक महिलांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ व व्यवसाय वाढीस कायम मदत करण्याचे आश्वासन दिले.

उमेद अभियानमधील रागिनी मोरे, प्रियंका खानापुरे, निलकंठ कदम यांनी महिला उद्योजकांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान कक्षातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभागसंघ व्यवस्थापक सीना भोसले, कृषी व्यवस्थापक सोनाली लंगोटे, पशुव्यवस्थापक दादा निंबाळकर, बँकसखी, लेखापाल, प्रभागसंघ पदाधिकारी व प्रभागातील प्रेरीका यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आण्णासाहेब जाधव यांनी तर आभार सचिन ढाकणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *