कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: पांगरी पोलीस ठाण्याअंतर्गत २८ गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली असून दलातील तरुणांना के. टी. ट्रॅक्टर्सच्या (KT Tractor’s) वतीने टी- शर्ट देण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट, के. टी. ट्रॅक्टर्सचे संचालक तात्या ठोंबरे, भारत सलगर उपस्थित होते.
पांगरी पोलीस ठाण्याअंतर्गत २८ गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना

याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिवकर म्हणाले की, ” ग्रामसुरक्षा दलातील तरुणांनी प्राथमिक माहिती पोलीस पाटील, बीट अंमलदार किंवा पोलीस अधिकारी यांना द्यावी. ग्रामसुरक्षा दलामुळे गुन्हेगारावर वचक बसून गुन्हाच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल व आपले गाव सुरक्षित राहील. “
दररोज रात्री १२ ते ४ च्या सुमारास ग्रामसुरक्षा दल गावात गस्त घालेल तसेच घारी या गावामध्ये सायरन बसविले असून गस्तीच्या वेळेत प्रत्येक तासाला हे सायरन वाजवावे,अशा सूचना सपोनि सुधीर तोरडमल यांनी दिल्या.
दरम्यान, इरशाद शेख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस पाटील नितीन वाघमारे, निळकंठ शेळके, बाबासाहेब शिंदे, सचिन ठोंबरे, आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट यांनी केले.