कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना दुसरीकडेच आपल्याच देशातील आदिवासीबहुल भागातील स्त्रियांचे प्रश्न, मूलभूत समस्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सुटल्या नसल्याची खंत डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी व्यक्त केली. त्या नगरभूषण श्रीमान भाऊसाहेब झाडबुके स्मृती आयोजित व्याख्यानमालेत बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की आदिवासी स्त्रियांच्या आरोग्य व शिक्षण विषयक मूलभूत समस्यांकडे, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आदिवासी स्त्रियांचे प्रश्न सुटले नाहीत- डॉ. ऐश्वर्या रेवडकर

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ दणाने म्हणाले की बार्शीच्या सुकन्या असणाऱ्या डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी सुरु केलेल्या समाजसेवेच्या, स्त्रियांच्या समतेच्या व न्याय हक्काच्या लढ्यात आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्यूएसी (IQAC) समन्वयक डॉ. गिरीश काशीद, सूत्रसंचालन डॉ. पुष्कर गांधी तर आभार प्रा.अतुल ढवळे यांनी केले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount