fbpx

लाॅकडाऊन संपला तरी अंध कलाकारांची उपासमार कायम

दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क

निगडी: पिंपरी चिंचवड मधील भोसरी ते निगडी मार्गावरील टाटा मोटर्स कंपनीच्या शेजारी असलेल्या यशवंत नगर सिग्नल शेजारी एक अंध कुटुंब उदरनिर्वाह साठी धडपड करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा अंध कुटुंब त्या सिग्नलवर सर्व वाद्यांसमावेत भजन गाऊन लोकांचे मनोरंजन करतात आणि त्यातून मिळालेल्या पैशातून ते आपलं उदरनिर्वाह करतात. या कुटुंबात तब्बल पाच ते सहा अंध व्यक्ती आहेत. यातील सर्वजण सर्व वाद्ये वाजवतात शिवाय भजन सुध्दा गातात. तसेच कलासागर भजन मंडळ असा त्यांच्या संघाचा नाव असून छोट्या छोट्या कार्यक्रमात त्यांना भजन साठी आमंत्रण दिले जाते. अतिशय सुंदर आणि सुरेख असा त्यांचा भजन असतो.

मात्र कोरोनाच्या काळात त्यांची मोठ्या प्रमाणात उपासमार झाली. तरी देखील ते हिम्मत न हरता पुन्हा सरसायला प्रयत्न करत आहेत. मात्र लाॅकडाऊन संपला तरी उद्योगनगरीतील कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्याने त्या रस्त्यावर नेहमीसारखी वर्दळ दिसत नाही. त्यामुळे सिग्नल शेजारी बसून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या त्या अंध कुटुंबाला पोट भरण्या इतकंही पैसे मिळविणे कठीण होत आहे. शिवाय कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने त्यांच्यावरील उपासमारीचे संकट कायम असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *