कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषिकन्या ऋतुजा दिलीप घोळवे हिने ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या अभ्यास दरम्यान घोळवेवाडी ता. बार्शी येथील प्रगतशील शेतकरी दिलीप वैजिनाथ घोळवे यांच्याशी संवाद साधला. कृषी महाविद्यालय पुणे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. डी. मासाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला. प्रा. एस. डी. बगाडे व केंद्रप्रमुख डी. ए. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. शेतकरी दिलीप वैजिनाथ घोळवे यांनी अडीच एकरमध्ये लिंबू उत्पादन घेतले आहे. त्यांनी या पिकासाठीखत म्हणून निम खलीचा वापर केला आहे. त्यामुळे लिंबूवर्गीय देवी रोगापासून बचाव होतो. त्याच बरोबर त्यांनी गोमूत्र, शेणखत यांचा देखील वापर केला आहे. संपूर्ण अडीच एकर बागेला ठिबक सिंचन केले आहे. दिलीप घोळवे यांनी सेंद्रिय पद्धतीला आधुनिकतेची जोड देत अडीच एकर मधून चार लाखाचे भरघोस उत्पादन घेतले आहे.
सेंद्रिय पद्धतीने, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्याने घेतले भरगोस उत्पादन
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount