कुतूहल न्यूज नेटवर्क
रविवारी सकाळी जम्मूमधील विमानतळावर तांत्रिक विभागात स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट भारतीय हवाई दलाकडून पूर्ण कामकाज चालवत असलेल्या भागात झाला आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.
जम्मू विमानतळावर स्फोट; बॉम्बशोध आणि फॉरेन्सिक पथक दाखल
भारतीय हवाई दलाकडून चालवल्या जाणाऱ्या सतवारी हवाई दल स्टेशनवर हा स्फोट झाला आहे. पहाटे २ वाजता हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. स्फोटामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. मात्र हा स्फोट किती मोठा होता याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Jammu and Kashmir: Explosion heard inside Jammu airport’s technical area; forensic team reaches the spot
Details awaited pic.twitter.com/duWctZvCNx
— ANI (@ANI) June 27, 2021