fbpx

अज्ञात वाहनाच्या धडकेत सुर्डीतील शेतकरी ठार

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी प्रतिनिधी : शेतामधील काम उरकुन रस्त्याच्या कडेने घराकडे निघालेल्या शेतक-याला पाठिमागुण भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील वैराग- सुर्डी मार्गावर घडला.गोवर्धन सौदागर शेळके, वय-५०वर्ष, रा. सुर्डी ता. बार्शी असे अपघातात मृत्यू मुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

रघुनाथ नागनाथ शेळके, वय- ४५ वर्ष, यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यातील फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे चुलत चुलते गोवर्धन सौदागर शेळके, हे सकाळी आठ वाजता. शेतात जाण्यासाठी घरातुन गेले होते. त्यानंतर शेतातील कामे आटपुन वैराग ते सुर्डी रोडवरुन गावाकडे घरी चालत येत असताना शेळके वस्ती, सुर्डी येथे आले असता त्यांना कोणत्यातरी अज्ञात वाहनाने पाठीमागुन धडक दिल्याने ते तेथेच जखमी अवस्थेत पडुन होते. त्यावेळी गावातील लोकांनी त्यांना फोन करुन कळविले.ते सदर अपघात घडले ठिकाणी गेले असता चुलते हे जखमी अवस्थेत पडलेने त्यांना औषधोपचाराकरिता लगेचच खाजगी ऍम्बुलन्स बोलवुन घेवुन उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे घेवुन जात असताना रस्त्यात मयत झाले आहेत.बार्शी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास हवालदार जनार्धन सिरसट हे करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *