fbpx

बार्शी तालुक्यातील ४३ हजार शेतकरी दुष्काळ अनुदानापासून वंचित

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यात दुष्काळ पडल्याने सन २०१८-१९ या वर्षासाठी शासनाकडून दोन हेक्टरची मर्यादा घालून ६ हजार ८०० रुपये दुष्काळी मदत जाहीर केली होती. परंतु अजून पर्यंत बार्शी तालुक्यातील सुमारे ४३ हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. दोन वर्षं ओलांडून देखील अद्यापही या अनुदानापासून शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे सदर दुष्काळ अनुदान त्वरित देण्यात यावे, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना देण्यात आले.

बार्शी तालुक्यात सण २०१८-१९ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाने दुष्काळ निधी मंजूर केला होता.  त्याचे तालुक्यातील ४५ हजार ७८ खातेदार शेतकऱ्यांना ३८ कोटी ५६ लाख ९७ हजार एवढी दुष्काळ अनुदान वाटप करण्यात आले आहे. तसेच वंचित शेतकऱ्यांना तत्काळ दुष्काळ निधीचे वाटप करून आर्थिक आधार द्यावा, या आशयाच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

या अगोदर देखील बार्शी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना देखील निवेदने देण्यात आली आहेत. तसेच रस्ता रोको, उपोषण करीत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. निवेदन देतेवेळी स्वराज शेतकरी महासंघाचे अध्यक्ष राहुल भड, युवराज काजळे, अनिल यादव, काकासाहेब भड, शैलेंद्र देशमुख, मनोज काकडे आदी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *