प्रतिनिधी आसिफ मुलाणी: कुतूहल न्यूज नेटवर्क
पोलिस उपनिरीक्षक अरुण वाघ,माजी सैनिक किशोर गुरव यांचा सत्कार
कारी : बार्शी तालुक्यातील मळेगाव याठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच देशामध्ये कोरोनाचे संकट असताना आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता देश सेवेसाठी खऱ्या अर्थाने आपली सेवा बजावून पोलीस दलामध्ये कोरोना योद्धा म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक प्राप्त,नवी मुबंई येथील पोलीस उपनिरीक्षक अरुण वाघ यांचा सत्कार श्री. शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने माजी सैनिक प्रल्हाद दळवी व माजी पोलीस उपनिरीक्षक महादेव नलावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच भारतीय सैन्य दलामध्ये आपली सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजी सैनिक किशोर गुरव यांचा सत्कार माजी सैनिक हरीश्चंद्र नलावडे व आजीनाथ गाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी श्री. शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी,अध्यक्ष अंकुश माळी, सरपंच गुणवंत मुंढे,माजी सरपंच सिद्धेश्वर मुबरें,माजी उपसरपंच भाऊसाहेब म्हमाणे,माजी सरपंच संतोष निंबाळकर,गावकामगर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष रामहरी गाडे,उद्दोजक शंकर विटकर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख,यशदाचे शिवाजीराव पवार,माजी सैनिक सोमनाथ विटकर,मंडळाचे संजय माळी,सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी,समाधान पाडुळे,गिरीश माळी आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय माळी यांनी मानले.