fbpx

कळसुबाई शिखर पार केलेल्या दिव्यांगांचा माहेर संस्थेकडून विशेष सत्कार

कुतूहल न्यूज नेटवर्क

पेरणे फाटा : माहेर संस्थे अंतर्गत दिव्यांगांसाठी संस्था संचालिका लुसी कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई पार केलेल्या दिव्यांगांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.  परिसरातील दिव्यांग बंधू आणि भगिनींनी या मेळाव्यात सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या मेळाव्यात दिव्यांग लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले. यावेळी दिव्यांगांना काही योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या वतीने त्यांना भेटवस्तू तसेच खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश दुतोडे यांनी केले.

felicitation from Maher Sanstha for disabled people who crossed Kalsubai

याप्रसंगी शरली अँथनी, रमेश धुतोंडे, आनंद सागर, विजय तवर, संजय इंगळे, तेजस्विनी पवार, सुमित इंगळे, अनिता गायकवाड, गायत्री निर्मळ, अनिता जाधव ,अर्चना घुंडरे, जान्हवी बोत्रे ,नितू पाटील, रघूनाथ सातव, किरण शिंपी, सतिष आळकूटे, जिवन टोपे, राजेंद्र सुपेकर नवनाथ वरपे, सुनिल चोरडिया, किसन खंडागळे डाॅ. सोमनाथ मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *