आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी : उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे कारी ग्रामपंचायतच्या १३ जागांसाठी ५ प्रभागातून हे सदस्य निवडले जाणार आहेत. साधारणपणे मतदार संख्या ही ४१५७ एवढी आहे.
कारी ग्रामपंचायतची होणार दुरंगी लढत
सरपंच पदाचे आरक्षण सोडत ही निवडणूक निकालानंतर करण्याचा ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला आहे, त्यामुळे सरपंच पदासाठी बहुमतासह नशिबाची साथ लागणार आहे. सध्या गावातील राजकीय चित्र पाहता निवडणूक रिंगणात दोन पॅनल आमने-सामने राहणार आहेत, पंचायत समितीचे माजी सभापती विनायक (आबा) विधाते आणि बाजार समितीचे संचालक शिवाजी (दादा) गायकवाड या दोन अनुभवी व्यक्तींच्या नेतृत्वाखाली दोन पॅनल आमने-सामने लढत देणार आहेत. मतदार राजा कौल कोणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, निकालानंतरच सत्ता कोण खेचनार हे स्पष्ट होणार आहे.