fbpx

पारधी समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा-बबिता काळे

विमल काळे : कुतूहल न्यूज नेटवर्क

सोलापूर: पारधी समाजाबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी अशोक नगरे यांना अटक करून कारवाई करा अशी मागणी आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचे बबिता काळे यांनी सोलापूर पोलीस अधिक्षक यांच्याकडे लिखी निवेदनातून केली आहे.

अशोक नगरे (रा.पारनेर जि.अहमदनगर) यांनी राज वाय. सलगर  (Raj Y.Salgar) यांच्या फेसबुक पोस्टवर पारधी समाजाबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामूळे समाजाची बदनामी झाली आहे. तरी त्यांच्यावर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तात्काळ अटक करून कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळीआदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचे राज्य समन्वयक परमेश्वर काळे व लखन काळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *