fbpx

मास्क न वापरल्यास सोलापूरात 500 रुपये दंड

कुतूहल न्यूज नेटवर्क

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करावे, या हेतूने आता जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड करण्याचे नवे आदेश काढले आहेत. त्याची अंमलबजावणीने (दि.२५) रविवारपासून केली जाणार आहे.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाची वाढती परिस्थिती लक्षात घेता, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींना शंभर रुपयांऐवजी पाचशे रुपयांचा दंड करावा, अशी विनंती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली होती.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 व कलम 64 मधील तरतुदीचा वापर करुन वाढीव दंडास परवानगी दिली आहे. शंभर रुपयांचा दंड असल्याने अनेकांकडून नियमांचे उल्लंघनच केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मास्कचा वापर केल्याने कोरोनापासून बचाव होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर आता दंडाची रक्‍कम वाढविल्यास निश्‍चितपणे सर्वजण मास्कचा वापर करतील, असा विश्‍वास या आदेशातून व्यक्‍त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *