बार्शी : हा विरूद्ध पार्टीचा आहे असे म्हणून पाच जणांनी चार चाकी गाडीतून येऊन एकास काठीने मारहाण करून शिविगाळ केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील घोळवेवाडीत घडला.
बार्शी तालुक्यातील घटना : विरूद्ध पार्टीचा आहे असे म्हणत पाच जणांनी एकास काठीने केली मारहाण
धनाजी माणिक तोगे, बबन मारुती मोराळे, दादा मोराळे, सुधिर मोराळे व नंदु घोळवे सर्व रा. घोळवेवाडी ता. बार्शी अशी मारहाण केल्याप्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
किरण उमाकांत डोळे,वय १९ वर्षे, रा. घोळवेवाडी ता. बार्शी याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, तो इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. सध्या शाळेला सुट्टी दिल्यामुळे तो घरच्या शेळ्या राखतो तर वडील ड्रायव्हर असून ते दुसऱ्यांच्या गाडीवर कामाला आहेत. सांयकाळी 0८/00 वा. सुमारास फिर्यादी घरी जेवण करुन बाहेर जिल्हा परीषद शाळे समोर घोळवेवाडी येथे आला असता समोरुन इन्होव्हा गाडी तिचा नंबर एमएच.११ बीएच २०७७ मध्ये धनाजी माणिक तोगे, बबन मारुती मोराळे व इटस गाडी नं एमएच १४ सीएक्स ७२९१ मध्ये दादा मोराळे, सुधिर मोराळे, नंदु घोळवे आले व त्यांनी मला पाहून गाड्या थांबविल्या व गाडीतू खाली उतरुन हा विरुद्ध पार्टीचा आहे असे म्हणून मला हाताने लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी, त्यांचे सोबत गाडीत असलेले अनोळखी चार ते पाच इसमांपैकी एकाने त्यांचे हातातील काठीने पाठीवर मारहाण केली. त्यावेळी दादा मोराळे हा गाडीतून हातात तलवार घेऊन खाली उतरला व शिविगाळी करुन मला हाताने मारहाण केली आहे. त्यावेळी आमचे गावातील गोपीनाथ घोळवे,अजय दराडे, संतोष पवार हे येऊन भांडणे सोडवत होते त्यावेळी गावातील इतर लोक जमा होवु लागल्याने सदर आरोपी हे तेथुन पळुन गेले. पांगरी पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.