कुतूहल न्यूज नेटवर्क – विजयकुमार मोटे
७४ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या नावे ठेवल्या मुदत ठेवी ; कोणी व किती रकमेच्या घ्या जाणून
अकलूज : फ्रटेली वाईन्स प्रा. लि. झंजेवाडी यांच्या वतीने ७४ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या १९ मुलींच्या नावे २० हजार रुपये प्रमाणे ३ लाख ८० हजार रुपये मुदत ठेव ठेवण्यात आली. या ठेवीचे प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, नंदिनीदेवी मोहिते पाटील व विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे व त्याच्या विवाह वेळी त्यांच्या कुटुंबा वरती आर्थिक बोजा येऊ नये यासाठी मदत म्हणून मुदत ठेव ठेवण्यात आली आहे. फ्रटेली वाईन्सच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी कामगारांसाठी व परिसरातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
या वेळी सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील, फ्रटेली वाईन्स प्रा. लि. चे संचालक अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, फ्रटेली वाईन्सचे घुले, एच. आर. संतोष, संदिप मगर व फ्रटेली वाईन्सचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.