पांगरी : कुतूहल न्यूज नेटवर्क
विक्रीसाठी विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या एकास पांगरी पोलिसांनी पकडले.त्याच्याकडून एकूण 59750 रुपयाचा माल जप्त केला आहे.याप्रकरणी योगेश चंद्रकांत माळी,वय 32,रा.नारी ता.बार्शी यास पोलिसांनी ताब्यात घेतले .पोलीस कॉन्स्टेबल उमेश कोळी यांनी फिर्याद दिली.
पांगरी पोलिसांनी पकडली विदेशी दारू
अधिक माहिती अशी की,पांगरी कडून नारीकडे एक इसम मोटरसायकलवरती दारूच्या बाटल्या घेवून जात असल्याबाबत पोलिसांना खबर मिळाली,त्यानंतर पोलीसांनी मौजे गोरमाळे येथे क्षीरसागर यांच्या शेताजवळ नाकाबंदी करुन योगेशला ताब्यात घेतले व त्याच्याकडून एमएच 13 बीवाय 3462 या क्रमांकाच्या मोटरसायकलीसह 9750 रुपयांच्या ऑफिसर चॉईसच्या 150 बाटल्या जप्त केल्या आहेत .पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.