कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शीचे माजी नगराध्यक्ष हेमंत सोनवणे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. सन २००६ ते २००९ या कालावधीत सोपल गटाकडून नगराध्यक्ष पदावरअडीच वर्षे त्यांनी बार्शीची सेवा केली. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने सोनवणे सर या नावानेच त्यांची बार्शीत ओळख होती. ते शिक्षण संस्थेचे संस्थापकही राहिले आहेत. बार्शी शहर आरपीआयचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्याशी त्यांची जवळीक होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई आणि २ भाऊ असा परिवार आहे.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount