fbpx

बार्शीत 13 पोलिसांसह 14 जणांना केले कॉरंटाइन

बार्शी : सोलापूर ग्रामीण दलातील पॉझिटिव्ह पोलिसांच्या संपर्कात आलेल्या बार्शीतील चौदा जणांना आज क्वार्टाईन करण्यात आले आहे अशी माहिती तहसीलदार प्रदीप शेलार यांनी दिली आहे. कॉरंटाइन केलेल्या चौदा जणांमध्ये तेरा पोलीस आणि अन्य एकाचा समावेश आहे.

सदर पोलीस कॉन्स्टेबल हा मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील असून तो सोलापूर मुख्यालयात कार्यरत आहे तो काही दिवसांपूर्वी बार्शीतील शिवशक्ती मैदान परिसरात वास्तव्यास होता त्यावेळी त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आज शोध घेण्यात आला. यामध्ये आता पर्यंत तेरा पोलीस आणि एक अन्य व्यक्ती संपर्कात आले असल्याचे दिसून आल्याने त्यांना आज तातडीने स्थानिक संस्थेत कॉरंटाइन करण्यात आले आहे.

शिवाय संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे सांगितले तसेच लवकरच त्यांची ही तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती दिली तरी नागरिकांनी अत्यावश्यक आणि महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि सरकारी सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

याबाबत अधिक माहीती की सोलापुर हेड ऑफिसमध्ये तसेच जिल्ह्याच्या चेकपोस्टची तपासणीसाठी आलेल्या पोलिस हा बार्शी येथे दि २२ एप्रिल रोजी येथील काही पोलिसा समवेत मुक्कामी राहीला होता. शिवशक्ती मैदान परिसरात ती रूम आहे.त्यानंतर तो २३ रोजी बार्शीतुन गेल्यानंतर त्याला व त्याच्या मित्राला त्रास होऊ लागल्याने सदर पोलिसांची तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव आल्याने त्या पोलिसाच्या थेट संपर्कातील 13 पोलिसांना सध्या कॉरंटाईन करण्यात आले आहे .

तसेच यानंतर दि. २८ एप्रिल रोजी बार्शी येथे पोलिसांची आरोग्य तपासणी झाली होती त्यामध्येही बार्शीतील कॉरंटाईन केलेल्या पोलिसांपैकी काही जण हजर असल्याची माहीती समोर येत आहे. तसेच यावेळी या आरोग्य तपासणीवेळी काही अधिकाऱ्यांचाही समावेश होता त्यामुळे अधिकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *