कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन अभावी अनेक जणांचे बळी गेले असल्याने सर्व मृत्य व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण व्हावी तसेच ऑक्सिजनची गरज किती महत्वाची आहे हे महत्व पटवून देण्यासाठी पोलिस भरतीची तयारी करीत असलेली शालेय तरुणी अमू जठार हिने लॉकडाऊनच्या काळात सुमारे २५० झाडे नागरिकांना मोफत वाटप करण्याचा संकल्प केला होता. दि. २१ मे रोजी सोबतच्या सहकारी मैत्रीण पुजा वाघमारे, क्रांती शिंदे व नवनाथ सुर्वे यांच्या मदतीने गेली 2 महिने आंबा, सिताफळ, तुळस, पिंपळ, जासवंत, पेरु, कडिपत्ता, चिक्कू यांसह विविध झाडांचे उत्तम रित्या लागवड व संगोपन करुन गणेश चतुर्थी सणाचे शुभ मुहूर्ताचे औचित्य साधत ५० झाडे शहर हरीत क्रांती व्हावे यासाठी ध्यास घेतलेल्या वृक्ष संवर्धन समिती व जाणीव फाऊंडेशन या दोन संस्थांना तर उर्वरीत २०० झाडे भगवंत मैदान येथे श्री गणेश मुर्ती विक्री स्टॉल येथे सामाजिक संघटना, मान्यवर व्यक्तींसह श्री गणेशाची मुर्ती घेऊन जाणाऱ्या नागरिकांना मोफत वाटप करण्यात आली.
ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये म्हणून तरूणींकडून २५० झाडे मोफत वाटप
यावेळी प्रसन्नदाता गणेश मंडळाचे बंडू माने, हर्षल रसाळ, पत्रकार गणेश घोलप, पाणीपुरवठा सभापती भैय्या बारंगुळे, प्रसिद्ध चित्रकार महेश मस्के, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर राऊत, उद्योजक नागेश सुरवसे, सतिश राऊत, प्रदिप हागरे, उमेश देशमाने, धनाजी मोरे, हेमंत शाहीर आदी उपस्थित होते. या राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचे अनेक नागरिकांनी कौतुक केले असून दिलेल्या झाडांचे उत्तमरित्या संर्वधन करणार असल्याचे अभिवचन दिले. निसर्गातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा व झाडांपासून मिळणारा नैसर्गीक ऑक्सिजन सर्वांना मोफत मिळावा तसेच ऑक्सिजन अभावी कुणाचाही मुत्यू होऊ नये म्हणून हा उयक्रम राबविल्याचे जठार हिने सांगितले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount