कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र व तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचे मोफत सर्वरोग निदान शिबिर उस्मानाबाद तालुक्यातील आंबेजवळगे याठिकाणी रविवार (दि.१० ऑक्टोंबर) आयोजित करण्यात आले होते.
आंबेजवळगा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
या शिबिरामध्ये ७५० नागरिकांनी मोफत तपासणी करून घेतली. यामधील १०० रुग्णांना तेरणा हॉस्पिटल नेरूळ, नवी मुंबई येथे दीर्घकालीन उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. यावेळी सरपंच आनंद कुलकर्णी, माजी सरपंच राजेसाहेब देशमुख, ग्रा. पं. सदस्य बालाजी जाधव, विजयसिंह विधाते, विनोद वायकुळे, हनुमंत वाघमोडे, लक्ष्मण जाधव, तेरणा हॉस्पिटलचे डॉ. अजित निळे व त्यांचे सहकारी, आरोग्य सेविका शिंदे, चव्हाण, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount