कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी (आसिफ मुलाणी): कारी- टोणेवाडी या पाच किलोमीटर रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न मागील ३२ वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर त्या रस्त्याचा प्रश्न सुटल्याने शेतकरी व वाहनधारकामधून समाधान व्यक्त होत आहे.
कारी- टोणेवाडी रस्त्यासाठी निधी मंजूर; आमदार राजेंद्र राऊत यांच्या मागणीला यश
आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यातील रस्त्यांसाठी 6 कोटी 41 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. तालुक्यातील 22 गावांच्या रस्त्याचे डांबरीकरण होणार असून यामध्ये कारी-टोणेवाडी या रस्त्याचा ही यामध्ये समावेश आहे.
कारी व टोणेवाडी ही दोन्ही गावे फळबागा, कांदा, द्राक्ष बागांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु शेतातील शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी गैरसोय होत होती. या रस्त्यावर सटवेश्वरी वस्ती, विधाते वस्ती, करंडे वस्ती ही आहे. या रस्त्यावर पडलेले मोठ मोठे खड्डे, वाढलेली काटेरी झुडपे यामुळे या रस्त्याने जाताना येताना शेतकऱ्यांना व वाहनधारकांना मोठा त्रास होत होता.
कारी-टोणेवाडी मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकरी व वाहनधारकांनाचा वेळ आणि त्रास कमी होणार आहे.