कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे आज सायंकाळी सोलापुरात खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गणपतराव देशमुख यांचे वय ९४ वर्षे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
ज्येष्ठ नेते ‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख यांचे निधन
गणपत देशमुखांना संपूर्ण राज्यभरात आबा नावाने त्यांना हाक मारली जात होती. अकरा वेळा आमदार म्हणून ते निवडून आले होते. त्यांनी सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम नोंदविला होता. ११९५ ची निवडणूक वगळता ते सलग आमदार राहिले होते. २०१४ साली त्यांनी शेवटची निवडणूक लढवली होती. शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले.