कुतूहल न्यूज नेटवर्क

सरकारी नियमांनुसार आम्ही गणेशमुर्ती बनवत आहोत. यावर्षी आमच्याकडे विविधरूपातील गणेशमुर्ती उपलब्ध आहेत. हा आमचा पिढीजात व्यवसाय असून, लोकांच्या मागणीनुसार मुर्ती बनवुन दिली जाते.– बालाजी कुंभार, पांगरी ता.बार्शी .
गृहविभागाच्या गणेशोत्स साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना:
> सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूटांची आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूटांची असावी.
> गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.
> नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.
> कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
> विसर्जन कृत्रिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.
> मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
> सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत.
> आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.
> गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
> नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.