कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: शहरातील मध्यवर्ती भागात असलेले गणेश रोड येथील गणेश तरुण मंडळ यांनी साध्या पद्धतीने गणेशाची स्थापना करीत दररोज वेगवेगळ्या फळांनी श्रींची आरास करुन रोज कोरोना महामारी मध्ये ज्यांनी प्रत्यक्षरित्या रुग्ण सेवा केली अश्या कोरोना योध्यांच्या हस्ते गणेशाची आरती करुन त्यांना गौरविले.
बार्शी- गणेश रोड येथील गणेश तरुण मंडळाने यंदा राबविला नाविण्यपूर्ण उपक्रम
त्यामध्ये शासकीय व खाजगी रुग्णांलयातील डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, पत्रकार, आशा वर्कर, पोलिस, आरोग्य व स्वच्छता कर्मचारी यांना श्री गणेशाच्या आरतीचा मान देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यंदा या मंडळाचे ७१ वर्षे पूर्ण झाले आहे यापुर्वी मंडळाने धार्मिक, पौराणिक, सांस्कृतिक, समाज प्रबोधनात्मक देखावे सादर केले आहेत. कोरोना महामारीच्या काळात मंडळाच्या वतीने अर्सेनिक अल्बमच्या ३० हजार नागरिकांना मोफत गोळ्या वाटप केल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण व नातेवाईक यांना २ महिने मोफत अन्नदान करण्यात आले आहे. बार्शी, वैराग, पांगरी येथील पोलिस ठाण्यास सॅनिटायझर कक्ष स्थापन करुन देण्यात आला.
गणेश उत्सवासाठी मंडळाचे मार्गदर्शक व संस्थापक महेश यादव व संतोष जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष अमोल हिंगमिरे, उपाध्यक्ष अमोल वायचळ, विनोद उमाटे, विरेंद्र शिराळ, योगेश कारंजकर, अनिल मुलगे, प्रविण गाढवे, संकेत ढोले, समर्थ बोटे, गणेश यादव, उमेश कारंजकर, सचिन वायचळ, नागेश खळदे, धनू लिगाडे, राहुल लिगाडे, सौरभ खळदे, सौरभ खळदे, हरिष वायचळ, रामभाऊ डोंबे, रामचंद्र घोंगडे, श्रीकांत सुपेकर, विजय वाघमारे आदी परिश्रम घेत आहेत.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount