कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूकीत भगवान बाबा मित्र मंडळ व माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या गटाने ११ च्या ११ जागा बिनविरोध मिळवत एक हाती सत्ता मिळवली आहे. माजी सरपंच अजय दराडे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत सर्व ११ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
घोळवेवाडी सोसायटीवर सोपल गटाचे वर्चस्व
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
हनुमंत खाडे, बालाजी घोळवे, शिवाजी घोळवे, अर्जुन घोळवे, अरुण तोगे, संदेश खाडे, पुष्पा घोळवे, अर्जुन काळेल, अर्जुन नागरगोजे, प्रभाकर घोळवे, भीष्माचार्य डोळे.
निवडणूक बिनविरोधसाठी दादाराव घोळवे, वसंत घोळवे, गोपीनाथ घोळवे, संभाजी घोळवे, किरण खाडे, प्रभाकर घोळवे, शंकर घोळवे, अरुण पवार आदींनी प्रयत्न केले. सर्व उमेदवारांचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी अभिनंदन केले.
(Gholvewadi society election won by sopal group)