कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
मुलींनी प्रशिक्षण घेऊन पुढे जाऊन स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनावे. करियर करण्यासाठी विविध क्षेत्र आहे .या क्षेत्रात ही करिअरच्या संधी आहेत त्या शोधा त्याप्रमाणे स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करून स्वतःचे आयुष्य घडवून मुलींनी स्वतःच्या पायावर उभा राहण्याची गरज असल्याचे मत सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले. त्या प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून मुलींसाठी मोफत शिलाई मशीनचे प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
मुलींनी स्वतःच्या पायावर उभा राहण्याची गरज- पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते
संस्थेच्या सचिव अनु मोहिते म्हणाल्या की प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांवर काम केले जाते. वंचित, निराधार, भिक्षा मागणारे मुलं समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. याचघटकातील मुलींनी आर्थिक दृष्टीने सक्षम व्हावा यासाठी मोफत शिलाई मशीन ट्रेनिंग सुरू केले आहे. पुढे जाऊन मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी स्पेस ७९ फाउंडेशन कडून प्रार्थना फाउंडेशनला चार शिलाई मशीन व ट्रेनरचे मानधन देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद मोहिते, स्पेस ७९ फाऊंडेशनचे प्रभाकर जमखंडीकर, शिरीष दंतकाळे, शर्मिला हुल्ले आदी उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount