कुतूहल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे वतीने ग्लोबल पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा सत्कार
बार्शी: युनेस्को व लंडन स्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा “ग्लोबल टीचर ऍवॉर्ड’ प्राप्त, सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शिक्षकवर्ग राजनजी सावंत, विकास उकिरडे, शिवाजीराव हावळे, किशोरकुमार बगाडे, श्रीहरि गायकवाड, दिपक काळे, वजीर फकिर, किरण डमरे, संजय वाकडे, धनाजी थीटे, सुधीर घाडगे आदी उपस्थित होते.