कुतूहल न्यूज नेटवर्क-विजयकुमार मोटे
कोरोनामुळे विठ्ठलाचे देऊळ बंद आहे,आलेल्या वाटेने परत घरी जावा, काळजी घ्या
पंढरपूर : या वर्षी कोरोनामुळे आषाढी वारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी भक्तांच्या आरोग्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना पंढरपूर शहरात प्रवेश दिला जात नाही. परंतु विठ्ठल भक्त वारकरी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने चालत येत असल्याचे चित्र आहे. येणाऱ्या वारकरी भक्तांना शहरात प्रवेश न देता त्यांना परत माघारी पाठविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी नेमण्यात आली आहे. अशा वेळी पंढरपूर शहरचे पोलीस नाईक विलास संपतराव आलदार यांनी वारकरी भक्तास जेवणाची सोय करून त्यांना विठ्ठल भक्तांना देऊळ बंद असून घरी परत जाण्यास विनंती केली.वारकरी यांनी पंढरपूर मध्ये न येवुन प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात येत आहे.