दयानंद गौडगांव: कुतूहल न्यूज नेटवर्क
अक्कलकोट : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक महिन्यांपासून सर्व शाळा- कॉलेज बंद होते, त्यानंतर आता हळूहळू परिस्थिती पुर्व पदावर येत असून शाळा व महाविद्यालये सुरू करण्यास जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
नाविंदगी जि.प. शाळेत इयत्ता ५ वी ते ८ वी वर्ग सुरू ; पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद
सोलापूर जिल्हा प्रशासनाने २७ जानेवारी पासून जिल्ह्यात ५ वी ते ८ वी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी भरलेला दिसला. शाळेत येताना प्रथम सर्व विद्यार्थ्यांच्या हाताला सॅनिटाइज करण्यात आले. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शाळेकडून मोफत मास्कचे वाटप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भिमाशंकर चिवडशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षक वर्गाने शाळेतील विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सिजन लेवल चेक करूनच शाळेत प्रवेश करू दिला.
अशा पध्दतीने अतिशय आनंदी, उत्साही व भयमुक्त वातावरणात शाळेची सुरुवात झाली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय मंगरुळे,शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा हसरमनी, चंद्रकांत लांबकाने, वैशाली डोंगरीतोट, रोहिणी गायकवाड तसेच गुणवंत खोसे आदींनी सहकार्य केले.