कुतूहल न्यूज नेटवर्क
वैराग: येथील मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्राम कोरफळे येथील मुलांना किराणा, धान्य व फळे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांतून संस्थेने सामाजिक दातृत्व जपले.
अशी ही सामाजिक बांधिलकी: महामानव संस्थेच्यावतीने स्नेहग्रामला किराणा, धान्याची मदत
अशोक नागटिळक महाराज यांनी समाजातील वंचित मुलांना मायेला ओलावा मिळावा, भूकेचा प्रश्न लक्षात घेऊन स्नेहग्रामला ही मदत दिल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी स्नेहग्रामच्या मुलांना अशोक नागटिळक यांचे अभिष्टचिंतन केले. तर महेश निंबाळकर यांनी अशोक नागटिळक यांचा सन्मान केला. याप्रसंगी मानवता बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव बापू नागटिळक, उपाध्यक्ष गौतम नागटिळक, महामानव बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, किरण खुरंगळे , परमेश्वर बिले, आकाश बनसोडे, रमेश नागटिळक, निलेश गिराम, आप्पा स्वामी, आप्पा हिवरे, सूरज मिसाळ, विष्णू शिंदे, बाळू नागटिळक, श्रीराज हजारे, विनया निंबाळकर, वर्षा चाबुक, शंतनु घळके, तुषार तिकटे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे कार्यक्रम आयोजन महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना भैरवनाथ चौधरी, सूत्रसंचालन गौतम नागटिळक तर आभार प्रदर्शन किरण खुरंगळे यांनी केले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount