कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून चाळीशी ओलांडणाऱ्या आयुष्यात कधीही दारु न पिणाऱ्या २५ ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उल्हासनगर महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी विकास चव्हाण व गौडगांवचे सरपंच स्वाती पैकेकर यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्रातील डॉ. मृणालिनी मोरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, ग्रामपंचायत सदस्य नागेश काजळे, सुशांत सुरवसे, मदन आरगडे, भास्कर काकडे, प्रभाकर भड, निखिल देशमुख, रघुनाथ गरड, बालाजी भड आदीं उपस्थितीत होते.
आयुष्यात कधीही दारु न पिणाऱ्या व्यक्तींचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान
