आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी प्रतिनिधी,दि.३० नोव्हेंबर: उस्मानाबाद तालुक्यातील कारी परिसरात ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला असून द्राक्ष बागांवर दाऊनी, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे, त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना अतिरिक्त फवारणी करावी लागत आहे.मार्चपासून कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता, यानंतर मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अशातच या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पुढे दिवसेंदिवस अनेक संकटामध्ये वाढ होत आहे.कारी परिसरात द्राक्ष बागायतदार यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत,रोजच करावी लागते फवारणी
”या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागेवर दाऊनी व भुरी या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आम्हाला फवारणी करावी लागत आहे.” महेश डोके,द्राक्ष बागायतदार कारी