कुतूहल न्यूज नेटवर्क
राजीव गांधी केंद्रीय निवासी आश्रम शाळेमध्ये अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांना अभिवादन
पांगरी प्रतिनिधी : राजीव गांधी केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पांगरी तालुका बार्शी या शाळेमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.सर्वप्रथम या दोन्ही महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा . जि .प .सदस्य प्राध्यापक संजीव बगाडे यांनी अण्णाभाऊ आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी अण्णाभाऊ यांच्या साहित्याचा विचार करून तसेच सामाजिक लोकांच्या भावना विचारात घेऊन त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्राला शिफारस करण्यात यावी अशा पद्धतीचे पत्र देऊन अण्णाभाऊ बद्दल आणि समाजाबद्दल आदर युक्त भावना व्यक्त केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले .फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या एस एस सी परीक्षेचा शाळेचा निकाल 90% लावल्याबद्दलशाळेच्या मुख्याध्यापिका सौ किरण बगाडे मॅडम उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे सर अधीक्षक वाहिद शेख वर्गशिक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले .तसेच या शाळेमधून प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. कुमारी स्वप्नाली गुणवंत घुले हिचा प्रथम क्रमांक आला प्रथमेश झालटे त्याचा दुसरा क्रमांक आला तर शुभम पालके याचा तृतीय क्रमांक आला या मुलांचा संस्थेचे अध्यक्ष श्री संजीव बगाडे सर ,ईटकुर येथील केंद्रीय आश्रम शाळेचे संस्थापक भारत मोरे साहेब,उपमुख्याध्यापक श्री रामकृष्ण मुळे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमास श्री लोंढे सर, श्री शिवाजी बगाडे सर,अधीक्षक वाहिद शेख ,राम सुतार, तानाजी चव्हाण ,सचिन नन्नवरे, विश्वास काकडे, गणेश गोडसे इत्यादी कर्मचारी तोंडाला मास्क बांधून व सोशल डिस्टंसिंग चा वापर करून उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक श्री लोंढे सर यांनी केले तर आभार श्री शिवाजी बगाडे सर यांनी मानले.