fbpx

राजीव गांधी केंद्रीय आश्रमशाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: पांगरी ता. बार्शी येथील राजीव गांधी केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये साजरी करण्यात आली.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका किरण बगाडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.  स्त्री शिक्षणाबाबत सावित्रीबाईंनी खूप संघर्ष करून महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. आज समाजामध्ये महिलांमध्ये जी शैक्षणिक क्रांती घडली आहे या क्रांतीच्या खऱ्या जननी या सावित्रीबाईच आहेत. आज स्त्रियादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत असे प्रतिपादन मुख्याध्यापिका बगाडे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी घावटे यांनी आभार पर्यवेक्षिका शैलजा राऊत यांनी मानले. वसतिगृह अधीक्षक वाहिद शेख, शिवाजी बगाडे , संजय सोनवणे, शिवशंकर धारूरकर,  शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *