कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्तीयाल सुर्डी येथे एच.एच.एस.एस. मुरलीधर स्वामीजी कृषि महाविद्यालय मालेगांव जिल्हा नाशिक येथील विद्यार्थिनी गीता दिलीप कदम हिने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत बार्शी तालुकातील सुडीऀ येथील शेतकऱ्यांना शून्य उर्जेवर आधारित शीतकक्ष कसे तयार करावे आणि त्याचे फायदे याविषयी माहिती दिली.
सुर्डी येथे शून्य उर्जेवर आधारित शीतकक्ष उभारणीवर मार्गदर्शन
शेतमाल काढणीनंतर जैविक आणि रासायनिक क्रिया होत असतात. फळे कमी तापमान व योग्य आर्द्तेमध्ये साठवल्यास या क्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळे फळांचा साठवण कालावधी वाढण्यास मदत होते, असे वातावरण तयार करण्यासाठी शीतगृहाची आवश्यकता भासते. शीतकक्ष उभारणीसाठी शीतकक्षाच्या तळाशी विटांचा एक थर द्यावा. कक्षाच्या भींती विटांचे थर देऊन रचाव्यात. दोन भिंतिमध्ये ३ इंच एवढी मोकळी जागा सोडावी. या जागेत नदीपात्रातील बारीक वाळू भरावी, शीतकक्ष झाकण्यासाठी बांबूचे किंवा नारळाच्या झावळ्या वापराव्यात, सावलीची जागा निवडावी, त्याठिकाणी चांगल्या पाण्याचा सतत पुरवठा असावा. शीतगृह पाणी शिंपडून पूर्णपणे भिजवून घ्यावे. रोज सकाळी व संध्याकाळी कक्षावर पाणी शिंपडावे. यामुळे कक्षामध्ये योग्य तापमान व आर्द्रता टिकवून ठेवली जाते. यात फळे आणि भाजीपाला ३ ते ४ दिवस टिकवून ठेवता येतो.
प्रात्यक्षिकासाठी प्राचार्य डॉ. पी.ए. तूरबटमठ, डॉ. एस.ए. राऊत, उपप्राचार्य डॉ. पी.के. सुर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.व्ही. अहिरे, प्रा. एस.व्ही बागल, प्रा. एस. के.उदमले, प्रा. जी.एस. बनसोडे, विषय तज्ज्ञ प्रा.एस. एस .बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount